मुख्य सामग्रीवर वगळा

Hambirrao mohite: the great maratha worrier ....... सरसेनापती हंबीरराव मोहिते

कराडमधील तळबीड या गावची पाटीलकी सांभाळणाऱ्या मोहिते घराण्यात इसवी सन १६४० साली हंसाजी मोहितेंचा जन्म झाला झाला होता. हंसाजींचे वडील संभाजी मोहिते शहाजी राजांच्या सैन्यात सहहवालदार होते. संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला होता तर हंसाजींच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या.
इसवी सन १६७४ साली आदिलशाही सरदार बहलोलखान याच्यासोबत लढाईत सेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. सेनापती पडल्याची वार्ता कळताच प्रतापरावांच्या फौजेत सरदार असलेल्या हंसाजी मोहिते यांनी सर्व सैनिकांचे मनोबल ढासळू न देता त्यांच्यात हिंमत निर्माण केली आणि बहलोल खानावर आक्रमण करून त्याला विजापूर पर्यंत पिटाळून लावले.
हंसाजींच्या या पराक्रमाने शिवाजी महाराजांना त्यांच्यात शहाणा, सबुरीचा सेनानी दिसला. महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला आणि आपला सेनापती म्हणून निवडले.
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागात स्वारी करून मोठी लूट जमा करून आणली. महाराजांच्या आज्ञेनुसार मुघलांच्या छावण्यांवर जबरदस्त प्रहार करून हंबीरराव मोहितेंच्या सैन्याने मुघलांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर त्यांनी खान्देश, गुजरात, बुऱ्हानपूर, वऱ्हाड, वरकड पर्यंत मजल करत मुघलांना हाकलून लावले. त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचा विस्तार बराच वाढला होता.
१६७७ साली कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले. या लढाईत हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला. विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य निवांत होते आणि त्यांच्या गाफील राहण्याचा फायदा उचलून हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठी सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तालावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दणादण उडविली . प्रचंड असा खजिना, हत्ती, घोडे मराठ्यांच्या हाती लागले. व्यंकोजीराजे सुद्धा हाती लागले होते, पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजीराजांस सोडून दिले.
छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर अष्टप्रधान मंडळीतील काही जणांनी संभाजीराजेंना डावलून हंबीररावांचे सख्खे भाचे युवराज राजाराम यांना गादीवर बसविण्याचे कारस्थान रचले. पण हंबीरराव मोहिते यांनी मात्र संभाजी महाराजांना पाठींबा दिला आणि त्यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून गादीवर बसवले.
संभाजीराजेंच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांनी मोघलांचे संपन्न असे बुऱ्हानपूर शहर लुटले. बुऱ्हानपूरचा विजय म्हणजे हंबीरराव मोहितेंच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. या विजयामुळे मोघलांच्या वर्चस्वाला चांगलाच तडा गेला. बुऱ्हानपूरच्या लुटीमुळे संतप्त झालेल्या औरंगझेबाने सगळी ताकद दख्खन ला वळवली.
१६८२ साली मोघल सरदार शहाबुद्दीनखान याच्यासोबत झालेली रामशेजच्या किल्ल्याची लढाई ही इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेलेली लढाई आहे. या लढाईमध्ये हंबीररावांनी किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या खानाला चांगलीच अद्दल घडवली होती. त्याच वर्षी हंबीरराव भीमा नदीच्या परिसरात मोघल सरदार कुलीखान बरोबर लढले.
डिसेंबर १६८२ ते फेब्रुवारी १६८३ दरम्यान शहजादा आझम बरोबर पन्हाळ्याजवळ लढाई झाली लगोलग २७ फेब्रुवारी १६८३ रोजी मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई झाली. जानेवारी १६८५ मध्ये रायगडच्या परिसरात शाहबुद्दीन बरोबर लढाई झाली.

नंतर डिसेंबर १६८७ मध्ये सर्जाखान चालून आला, वाईच्या परिसरात उभयपक्षी निकराची लढाई होऊन मराठ्यांनी सर्जाखानच्या फौजेची दाणादाण उडवून मुघलांना पराभूत केले. पण लढाईच्या काळात गर्दीमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रत्येक लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांचे नाव आवर्जून पाहायला मिळते.

शिवरायांच्या पश्च्यात हंबीरराव खंबीरपणे शंभू राजांच्या पाठीमागे उभे राहिले. ऐन धामधुमीच्या काळात हंबीरराव पडल्यामुळे संभाजीराजांचा मोठा आधार नाहीसा झाला. ते जिवंत असते तर कदाचित छत्रपती संभाजी महाराजांना कोणी दगाबाजीने पकडु शकले नसते.
तळबीड या त्यांच्या मूळगावी हंबीररावांची समाधी आहे.
स्वराज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सरसेनापतींना मानाचा मुजरा.

धन्यवाद..!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपति शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यात 🚩

# छत्रपति_शिवाजी_महाराज_जावळीच्या_खोऱ्यात 🚩 जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्‍वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे! तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!’’ जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्‍या चंद्रराव मोर्‍यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्‍वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्‍यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोर्‍यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. ‘चंद्रराव’ हा मोर्‍यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोर्‍यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे ‘चंद्रराव’ झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोर्‍यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही...

प्रगल्भता म्हणजे काय?(what is maturity?)

· प्रगल्भता म्हणजे काय? · (what is MATURITY) · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता. · प्रगल्भता म्हणजे ...