कराडमधील तळबीड या गावची पाटीलकी सांभाळणाऱ्या मोहिते घराण्यात इसवी सन १६४० साली हंसाजी मोहितेंचा जन्म झाला झाला होता. हंसाजींचे वडील संभाजी मोहिते शहाजी राजांच्या सैन्यात सहहवालदार होते. संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला होता तर हंसाजींच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. इसवी सन १६७४ साली आदिलशाही सरदार बहलोलखान याच्यासोबत लढाईत सेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. सेनापती पडल्याची वार्ता कळताच प्रतापरावांच्या फौजेत सरदार असलेल्या हंसाजी मोहिते यांनी सर्व सैनिकांचे मनोबल ढासळू न देता त्यांच्यात हिंमत निर्माण केली आणि बहलोल खानावर आक्रमण करून त्याला विजापूर पर्यंत पिटाळून लावले. हंसाजींच्या या पराक्रमाने शिवाजी महाराजांना त्यांच्यात शहाणा, सबुरीचा सेनानी दिसला. महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला आणि आपला सेनापती म्हणून निवडले. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागात स्वारी करून मोठी लूट ज...
मराठी मनाचं मराठी संकेतस्थळ